• मा. सभासद – पुणे म.न.पा.
    मा. सभासद – स्थायी समिती
    अध्यक्ष – धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान
    अध्यक्ष – धारेश्वर नागरी सह. पतसंस्था
    अध्यक्ष – रेणुका फाऊंडेशन, सिंहगड रोड, पुणे
    कार्याध्यक्ष – कै. चंद्रकांत दांगट पाटील सार्वजनिक वाचनालय शासनमान्य (तालुका 'अ' वर्ग)

नवा प्रभाग, नवी दिशा...
सर्वसमावेशक विकासाच्या नव्या पर्वासाठी
आपण सर्व सज्ज होऊया !
प्रिय मतदार बंधू- भगिनींनो
सस्नेह नमस्कार!

समाजकारण आणि राजकारणातील प्रवासात आपल्या सर्वांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. आज वाढत्या शहरीकरणाच्या प्रवाहात आपला परिसर पुणे महानगरपालिकेत प्रथमच समाविष्ट झाला आहे.आता खऱ्या अर्थाने आपल्या सर्वसमावेशक विकासाच्या नव्या पर्वाची सुरूवात आहे.
आपल्या नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्र.३३ ' शिवणे -खडकवासला - धायरी ( पार्ट ) "च्या सर्वांगीण विकासाला आता आपल्याला आकार द्यायचा आहे.त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.अनुभवांची,सामाजिक बांधिलकीची शिदोरी आमच्याकडे आहे शिवाय तुमच्या सूचनांनाही स्थान आहे.कारण लोकांना काय हवे,काय नको हेच महत्वाचे आहे, तरच प्रभागाचा सर्वांगीण विकास सहजशक्य आहे.
भविष्यातील शाश्वत विकासामुळे आपल्या सर्वांचे दैनंदिन जीवन सुसह्य होईल,सर्वसमावेशक विकास प्रकल्पांच्या पायाभरणीतून आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून निघेल,यासाठी तुमचा सहभाग महत्वपूर्ण आहे. आपली मते केवळ निवडणुकीपुरती सीमित न राहता ती विकासाच्या प्रवाहाला दिशा देणारी ठरावीत, हीच आमची अपेक्षा. कारण यंदा आपल्यासाठी पुणे महानगरपालिका निवडणूक प्रथमच होणार आहे. 'नवा प्रभाग, नवी दिशा...शाश्वत, समतोल आणि सर्वसमावेशक विकासाच्या या नव्या पर्वासाठी आता ठाम निर्णय घ्यायचा आहे.चला, आपण सर्व मिळून घडवूया शाश्वत, समतोल आणि सर्वसमावेशक ‘शिवणे - खडकवासला - धायरी’!

  • शैक्षणिक:

    ग्रामीण भागातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने १९९९ मध्ये आमच्या कुटुंबियांच्या व मित्र परिवाराच्या मदतीने धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान ची स्थापना धायरी मध्ये केली. फक्त ४ मुलींपासून सुरु झालेली संस्थेची वाटचाल आज तब्बल ६५०० पेक्षा जास्त विद्यार्थी अत्यंत चांगल्या प्रकारचे शिक्षण या संस्थेच्या विविध शाखांमधून घेत आहेत. उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि नि मनोरथे हे ब्रीद समोर ठेऊन संस्थेची आता २५व्या अमृतमहोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल होत आहे आणि हेच संस्कार विद्यार्थ्यांवर घडवले जात आहेत. मराठी, सेमी इंग्लिश व इंग्रंजी माध्यमातून कन्याशाळा, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अशा विविध संस्थांमार्फत हा शिक्षण यज्ञ अखंडपणे चालू आहे.

    आमचे वडील कै.श्री.बंडोजी खंडोजी चव्हाण यांनी आमच्यावर नेहमीच प्रामाणिकपणाचे व श्रमाला महत्त्व देणारे संस्कार घडवले. 'कष्ट हे केलेच पाहिजेत,त्यातूनच तुम्ही तुमचा उज्ज्वल भविष्यकाळ घडवू शकता.' असे त्यांचे मत होते. कष्टाचे, सचोटीचे संस्कार घडविणाऱ्या माता पित्यांचे ऋण या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सर्व चव्हाण परिवार, मित्र व हितचिंतकांच्या सहाय्याने फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे.

    राजकीय:

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पक्ष स्थापनेपासुन आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब, महार्श्त्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब, ना. जयंतरावजी पाटील साहेब व बाराती लोकसभा मतदारसंघाच्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये सक्रीय आहे. प्रथम पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष, २००२-२००७ मध्ये पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, प्लानिंग कमिटी सदस्य या नात्याने वडगाव – धायरी परिसरामध्ये अनेक विधायक विकासकामे केली. मला इथे नमूद करताना आनंद होत आहे की राजाराम पूल ते माणिकबाग (सिंहगड रोड) या रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ही याच काळात झाला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष या नात्याने पक्ष संघटने बरोबरच मतदारसंघातील ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अगदी सचोटीने पक्षाचे काम करत आलो आहे.

    सामाजिक:

    रेणुका फौंडेशन: मोफत शालेय साहित्य वाटप, कन्या गर्भ संवर्धन अभियान, वृक्षारोपण सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक,आर्थिक क्षेत्रात माझे काम अविरतपणे सुरूच आहे. भविष्यातील या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी निवारण करून या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत आणि प्रयत्नशील राहणार आहे. 'जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा' या उक्तीप्रमाणे आजतागायत माझी वाटचाल चालू आहे. हे करताना आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा, आपले सहकार्य कायमच मला लाभले, याची मला जाणीव आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या आपल्या परिसरामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत आहे परंतु अजुनही अनेक मुलभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत. यापूर्वीही विविध विकासकामे मार्गी लावली आहेत, अजूनही खूप काही करावयाचे बाकी आहे. त्यासाठीच येणाऱ्या काळात आपले आशीर्वाद, शुभेच्छा, सहकार्य सदैव राहील हीच अपेक्षा, हीच विनंती.


बातम्या

व्हिडीओ

Be the Change, Lead the Future